परिणीती पंढरपूरकर 1176
परिणीती पंढरपूरकर 1176's Channel
 
परिणीती पंढरपूरकर 1176 has no videos available.
 
परिणीती पंढरपूरकर 1176
Your channel viewers will see links here, including "subscribe" and "add as friend".
Profile
 
Name
परिणीती पंढरपूरकर 1176
Description
नमस्कार 🙏🙏🙏
Subscribers
6.82K
Subscriptions
Recent Activity  
परिणीती पंढरपूरकर 1176 *❝ बहे-बोरगावच्या मारुतीची कथा ❞* 'सांगली' जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठावर 'बहे-बोरगाव' नावाचे बेट आहे. कृष्णाबाईचा प्रवाह दुभंगून मध्यभागी बेट तयार झाले आहे. 'समर्थ रामदास' या बेटावर ध्यानाला बसले असताना त्यांना अशी स्पंदने जाणवली की, हे ठिकाण हनुमंताचे आहे. रावण वधानंतर श्रीराम, लक्ष्मण, सीता अयोध्येस परत येत असताना, त्या बेटावर थांबले होते. कृष्णाबाईच्या काठी श्रीरामचंद्र संध्यावंदन करीत असताना, कृष्णाबाईला अचानक पूर आला. पुरामुळे श्रीरामचंद्रांच्या उपासनेत विघ्न येईल, अशी हनुमंताला शंका आली. म्हणून हनुमंताने पर्वतासारखे विराट रूप धारण करून आपल्या दोन्ही बाहूंनी कृष्णाबाईचा प्रवाह अडविला. कृष्णाबाई दुतर्फा होऊन वाहू लागली आणि मध्ये तयार झालेल्या बेटावर प्रभू श्रीरामचंद्र संध्यावंदन करीत राहिले. आपण अशा पवित्र बेटावर ध्यान करीत आहोत, या कल्पनेने समर्थ रोमांचित झाले. ज्या हनुमंताने हे पाणी अडविले, त्याचे अस्तित्व इथे कुठेतरी असले पाहिजे.. असे समर्थांना वाटू लागले. हनुमंताच्या शोधासाठी त्यांनी पाण्यात बुडी मारली. समर्थ पट्टीचे पोहणारे होते. त्यांचा कुंभकाचा अभ्यास दांडगा असल्यामुळे एखाद्या पाणबुड्याप्रमाणे ते दीर्घकाळ पाण्यात राहू शकत. समर्थांनी कृष्णेच्या जलाशयातून हनुमंताची मूर्ती शोधून काढली. आजही बहे-बोरगावला हनुमंताची भव्य मूर्ती पाहायला मिळते. *समर्थांनी शेकडो हनुमंताची मंदिरे स्थापन केली. त्यांतील 'अकरा मारुती मंदिरे' महत्त्वाची मानली जातात. चाफळातील दोन, शिंगणवाडी, माजगाव, उंब्रज, मसूर, शहापूर, बहे-बोरगाव, बत्तीस शिराळा, मनपाडळे आणि पारगाव या अकरा मारुतींत बहे-बोरगावचा नंबर लागतो.* *श्रीराम !!* ⛳🪻🌿⛳🌿⛳🪻🌿⛳ (1 year ago)
 
 
परिणीती पंढरपूरकर 1176 *श्री दत्तगुरू* 🙏🏻🪷🚩 *आजचे त्रिमूर्ती दर्शन भीमा-अमरजा संगम निवासी श्री राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री श्रीमन श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज🪷* 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 *श्रीक्षेत्र गाणगापूर ....🙏🏻 🚩* 🌌🌄🌌🌄🌄🌌🌄🌌 *!! अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त !!* 🍃🍂🍃🍂🍂🍃🍂🍃 (1 year ago)
 
 
परिणीती पंढरपूरकर 1176 कलियुग काय आहे????? 🙏🕉️🙏 एकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- "कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल?" 🌹 या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला, "कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो." असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेवून येण्याची आज्ञा दिली. सर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले. जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजुळ आवाज ऐकूआला तो त्या आवाजाकडे वळला त्याने पाहिले एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे पण त्याचवेळी जिवंत सशाचे मांस खात आहे, तो ससा खूप वेदना सहन करत आहे. या दैवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ते ठिकाण पटकन सोडले. भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या. एका विहरी भोवती चार विहीरी होत्या. चार विहिरीतील गोड पाणी त्यांच्यात साठून राहू शकत नसल्याने त्या विहिरीबाहेर पडत आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहीरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मधे असेलेली विहीर कोरडी होती.हे पाहून भीम चक्रावून गेला. नकूल जेव्हा बाण घेवून माघारी येत होता तेव्हा त्याने एक ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे. जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली. पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते. खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासुन वेगळे करू शकले. तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते. हे पाहून नकूल गोंधळून गेला. सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले एक मोठ्ठी शिळा खाली कोसळत आली. ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा, दगडांचा चुराडा करत होती पण तीच शिळा एका लहान रोपामुळे थांबली. यावेळी सहदेवही चकीत झाला. 🙏🕉️🙏 या चौघांनी हात जोडुन या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला....... श्रीकृष्णदेव हसले आणि त्यांनी अर्थ सांगितला..... "कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधूर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करतील जसं कोकिळा त्या सशाचे करत होती. कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील.श्रीमंताकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही. कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले. कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधःपतन काही केल्या थांबणार नाही पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षणकरील, त्यांचा उद्धार होईल जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासुन रोखले." या कथेतून श्रीकृष्णाला आपल्याला फक्त कलियुग कसे असेल एवढेच सांगाचे नाही तर या कलियुगात आपण कसे राहिले पाहिजे हेही सांगितले आहे. आपण कसे वागले पाहिजे हे पाहू.. 🙏🕉️🙏 १) आपली आध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी आपण आपला आध्यात्मिक गुरू निवडताना डोळसपणे, विचारपूर्वक निवड केली पाहिजे, म्हणजे शोषणाचा प्रश्नच उद्भवणार नाही.. २) आपण आपल्यापरीने गरीबांना नित्य मदत केली पाहिजे.. ३) आपण आपल्या मुलांवर, पालकांवर, नातेवाईकांवर इतर कोणावरही प्रेम केल पाहिजे, पण आपले प्रेम समोरच्याला त्रासदायक ठरणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे.. ४) आपले चारित्र्य आपण प्राणपणाने जपायला पाहिजे.त्यासाठी आपण परमेश्वराच्या नामस्मरणाचा आधार घ्यायला पाहिजे. आपला हात आपण त्याच्या हातात दिला तर आपले चारित्र्यसंवर्धन करण्याची जबाबदारी तोच घेईल. 🙏🕉️🙏 (1 year ago)
 
 
परिणीती पंढरपूरकर 1176 #अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त #श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏 (3 years ago)
 
 
Friends
Channel Comments
There are no comments for this user.